Share This Article
Ganpati Stotra हे विघ्नहर्ता, बुद्धीचे दाता आणि मंगलकार्याचे अधिष्ठाता असलेल्या भगवान श्रीगणेशाला अर्पण केलेले स्तोत्र आहे. याच्या पठणाने विघ्ने दूर होतात, कार्यसिद्धी मिळते आणि आयुष्यात शांती व समृद्धी लाभते. शुभारंभ, पूजा व धार्मिक विधींमध्ये गणपती स्तोत्राचे पठण अत्यंत मंगलकारक मानले जाते.
Ganpati Stotra Music Video
Ganpati Stotra Marathi
साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |
भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||
प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |
तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||
पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |
सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||
नववे श्रीभालचंद्र दहावे श्रीविनायक |
अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||
देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर |
विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||
विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन |
पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||
जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ |
एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||
नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |
श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||